महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना
Affiliated to: ALL INDIA INDEPENDENT LABOUR UNION(ILU) (Reg.No.NGP.-1064)
संघटने कार्य
संघटनेची लिखित घटना व नियमावली आहे. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील वितरण, पारेषण, निर्मित कंपन्यामधील SC/ST/DT-NT/OBC/Minority या वर्गामधील वीज कर्मचाऱ्यांना संघटीत करण्याची तरतुद आहे. मागासवर्गीयांना संघटीत करून त्यांचे न्याय्य प्रश्न, तसेच सामाजिक व आर्थक प्रश्नांना घेऊन संघर्ष करण्याचे अभिवचन संघटनेच्या घटनेव्दारे देण्यात आले आहे. उपरोक्त घटनेतील तरतुदीच्या आधारावर संघटनेची ट्रेड युनियन अँक्ट – 1926 अंतर्गत महाराष्ट्र पातळीवर ’’महाराष्ट्र राज्य’’ असे कार्यक्षेत्र असणारी संघटना अशी नोंदणी झाली आहे. ही संघटना वेल्फेअर असोसिएशन नाही तर ट्रेड युनियन आहे.
संघटनेची उद्दिष्टे
संघटनेची व्याप्ती:
1) अनुसूचित जाती
2) अनुसूचित जमाती
3) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्ग
4) ओ. बी. सी. (इतर मागासवर्गीय)
5) यांचेशिवाय धार्मिक अल्पसंख्याक, मुस्लिम, शिख, ईसाई, पारशी, बौध्द
या मागासवर्गीय बहुजन कर्मचाÚयांना संघटीत करून, त्यांच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करणे, त्यांचेवर होणारा अनयाय, अत्याचार, भेदभावाच्या विरोधात संघर्ष करून नयाय प्राप्त करणे. या बहुजन कर्मचाÚयांवर फुले – आंबेडकरी विचारांचे संस्कार करून समता, स्वातंत्र्य बंधुभाव व न्यायाची समाजव्यवस्था निमाण रण्यासाठी त्यांना सज्ज करणे. मागसवर्गीयावर असणारा अंधश्रध्देचा , दैववादाचा पगडा दूर करून त्यांना वैचारिक दृष्टी देणे.